ऐनपूर महाविद्यालयात बहिणाबाई जयंती साजरी
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात आज बहिणाबाई जयंतीनिमित्त बहिणाबाईंना अभिवादन करण्यात आले.
सदर प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मराठी विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी बहिणाबाईंच्या कृषीविषयक जीवनाविषयी माहिती दिली. बहिणाबाईंचे जीवनविषयक तत्वज्ञान यांच्या कवितेतून व्यक्त असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे घेण्यात आला.


