खरेदी - विक्रीचे व्यवहार आर्थिक नशेत झाल्याचे उघड : चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 खरेदी - विक्रीचे व्यवहार आर्थिक नशेत झाल्याचे उघड :

चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी


यावल  ( सुरेश पाटील ) एका वेंडरने एका शेताचे खरेदी खत टाईप करताना गट क्रमांक चुकीचा टाकल्याने त्या शेताचे खरेदी खत झाले आणि खरेदी घेणार व देणार यांची शुद्ध फसवणूक झाली तसेच बोगस खरेदी खत नोंदविले गेल्याची तक्रार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे १२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल झाल्याने यावल येथे तो स्टॅम्प वेंडर व संबंधित जबाबदार यंत्रणा ही आर्थिक नशेत कामकाज करीत असल्याचे पुरावे समोर आले आहेत.[ads id="ads1"]


जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे १२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल तक्रार प्रत्यक्ष बघितली असता त्यात नमूद करण्यात आले आहे की. यावल तालुक्यात गट क्रमांक २९६ / १ यापैकी सामाईकात शेतजमीन होती. या शेतजमीनचा विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यामुळे खरेदी देणार व घेणार यांनी महाजन नावाच्या स्टॅम्प वेंडर कडे गट क्रमांक २९६ / १ या शेताचा ७ /१२ उतारा तसेच घेणार व देणार यांचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड तसेच खरेदी खताचा व नोंदणीचा संपूर्ण खर्च रुपये ६० हजार रोख दिले. परंतु वेंडर महाजन यांनी सदर खरेदी खत टाईप करताना खरेदी खटतात गट क्रमांक २९६ / २ ऐवजी गट क्रमांक २६९ /१ टाईप केला आहे. [ads id="ads2"]


खरेदी खताचा दस्त नोंदणीसाठी तत्कालीन दुय्यम निबंधक यावल यांच्याकडे महाजन दस्त नोंदणीसाठी ठेवला असताना दुय्यम निबंध यांनी रस्ता मधील गट नंबर तपासणी न करता नोंदणी करून घेतला आहे.


नोंदणी झालेला दस्त ऑनलाइन तत्कालीन तलाठी हेमंत जोशी यांच्याकडे सूची क्रमांक मध्ये गट क्रमांक २६९ / १ हा चुकीचा गट क्रमांक असल्यावर सुद्धा गाव नमुना ६ फेरफार नोंदवही मध्ये तलाठी हेमंत जोशी यांनी मंजुरीसाठी पाठवला. आणि मंडळ अधिकारी महाडिक यांनी ती नोंद बेकायदेशीरपणे आणि शासकीय कर्तव्यात / आर्थिक नशेत नोंद क्रमांक ४०२९ मंजूर करून घेतली आहे.

संबंधितांनी कागदपत्राची व खरेदी खत दस्ताची व्यवस्थित पाहणी केली नाही वाचन केले नाही सदर खरेदी खत बोगस पद्धतीने नोंदणी झालेले आहे विद्यमान दुय्यम निबंधक यावल यांच्याकडून माहिती घेतली असता आता सदर खरेदी कथा मध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही असे तक्रारदार यांना सांगण्यात आले सबब संबंधित अधिकारी तलाठी सर्कल स्टॅमिंडर यांनी आमची पद्धतशीरपणे फसवणूक केली आहे व आमचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे तरी वरील प्रकरणाची रीतसर चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे असे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले असले तरी या प्रकरणाकडे संपूर्ण महसूल क्षेत्राचे लक्ष लागून आहे.


याचप्रमाणे एका प्रकरणात मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने यावल दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी झाल्याचे प्रकरण सुद्धा उघडकीस आल्याने यावल तालुक्यात संबंधित अधिकारी,कर्मचारी हे शासकीय कर्तव्य आर्थिक नशेत करीत असल्याचे सिद्ध झाले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!