शबरी,रमाई,पीएम आवास घरकुल योजनेचा विषय गाजणार?
शबरी,रमाई घरकुल लाभार्थींना लाभ मिळेल की वंचितच राहणार ?
रावेर प्रतिनिधी (मुबारक तडवी)
जळगाव जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून व सीईओ माननीय आमदार श्री अमोल भाऊ जावळे, रावेर विधानसभा व माननीय आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर तालुका तक्रार निवारण सभा" आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड रावेर येथे होणार आहे. (ads)
सदर तक्रार निवारण सभेत नागरिकांच्या घरकुला संबंधी तक्रारी व अडचणी सोडविण्यात येणार आहेत.तरी रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की घरकुल संबंधी अडचण वा तक्रार असल्यास उपस्थित रहावे.असे आवाहन रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी केले आहे



