वनोली शिवारात मोरांच्या शिकाऱ्यांना वन विभागाने पकडले : 5 मृत मोर जप्त
फैजपूर (प्रतिनिधी आदित्य गजरे)
दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वनपाल फैजपूर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर फैजपूर राऊंड स्टाफ व वनकर्मचाऱ्यांनी मौजे वनोली शिवारात डबा धरला. दरम्यान बंदुकीचा आवाज येताच कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम राबवित दोन संशयित इसम रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक बंदूक, दोन चाकू, टॉर्च, मोटरसायकल तसेच शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 05 मृत मोर देखील पोत्यात आढळून आले. आरोपींची नावे (1) सलिम रुबाब तडवी . (2) सैय्यद अफसर अली मुश्ताक अली रा. मारुळ ता. यावल, जि. जळगाव अशी आहेत. (ads)
दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी यावल येथे आणण्यात आले. याप्रकरणी वनरक्षक बोरखेडा बु. यांच्या फिर्यादीवरून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून (प्र. रि. क्र. 05/2025) नोंदविण्यात आला आहे. आरोपींना आज दुपारी माननीय न्यायदंडाधिकारी वर्ग-1 यावल यांचेसमोर हजर केले असता त्यांना 03 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.(ads)
संपूर्ण कारवाई म. श्रीमती निनु सोमराज (वनसंरक्षक प्रादेशिक धुळे), म. श्री. जमीर एम. शेख (उपवनसंरक्षक प्रा. यावल जळगाव), म. राजेंद्र सदगीर (विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे), म. समाधान ए. पाटील (सहाय्यक वनसंरक्षक प्रा. व कॅम्पा यावल), तसेच म. स्वप्नील एम. फटांगरे (वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान वनपाल फैजपूर व रेंज स्टाफ हजर होते.
पुढील तपास यावल वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.(ads)



