रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून त्यांना आरोग्यलाभासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. (ads)
या उपक्रमास काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष संघरक्षक (धुमा) तायडे, ॲड. योगेश गजरे, यशवंत धनके, मा. अय्युब मेंबर, आदिवासी नेते दिलरूबाब तडवी, विनायक महाजन, ललित पाटील, गारखेडा सरपंच रतन बारेला, गयास मेंबर, रामदास लहासे, राहुल पाटील, भिमराव तायडे, मंजूर टेलर, भुपेंद्र जाधव, छोटू तडवी, ईश्वर इंगळे, भाग्येश चौधरी आदी मान्यवरांसह तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(ads)
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर रुग्णांच्या सेवेसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आश्वासन देण्यात आले. (ads)
काँग्रेस पक्ष हा केवळ सत्तेसाठी नाही तर समाजातील दुर्बल, वंचित व पीडित घटकांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे. या ठिकाणी झालेल्या फळवाटप उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा अधोरेखित झाली. “जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भूमिकेवर काँग्रेस पक्ष आजही ठाम असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.