सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती महोत्सवी वर्षानिमित्ताने ऐनपूर महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिवस व सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरे
ऐनपूर:ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० जयंती वर्षानिमित्ताने पारंपरिक वेशभूषा दिवस व सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने होते.
तसेच उप प्राचार्य डॉ एस एन वैष्णव, डॉ पी आर महाजन, डॉ जे पी नेहेते, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर, प्रा सौ रेखा पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित होते. सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व विद्यार्थिनी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ जे बी अंजने यांनी भारतीय संस्कृती व वेशभूषा जगात सर्वात उत्कृष्ट आहे असे सांगितले तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे संस्कार व संस्कृती साठी केलेले कार्य सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता कोळी व वेदिका पाटील यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा ऋतुजा पाटील यांनी केले.
भारतीय संस्कृती जगात सर्वात श्रेष्ठ आहे व ती आपण जपली पाहिजे असे आव्हान प्रा ऋतुजा पाटील यांनी केले.तर आभार प्रा वैष्णवी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थिनी कडून सादर करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा वैष्णवी पाटील, प्रा कोमल सुतार, प्रा हर्षा महाजन, प्रा भारती पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच श्रेयस पाटील, प्रणव पाटील, हर्षल पाटील यांनी विशेष सहकार्य केले.