डंपरने मोटार सायकल स्वरास चिरडले : पती-पत्नी सह मुलगी जागीच ठार : मुक्ताईनगर येथील पूर्ण फाट्यावरची दुदैवी घटना
मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्या जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील मुरूम भरलेल्या डंफरने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी सह लहान मुलगी सह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुदैवी घटना घडली.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ होत आहे.
(ads)
सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर - बऱ्हाणपूर महामार्गावर पूर्ण फाट्याजवळ डंपर क्रमांक MH19 CX2038 व मोटरसायकल क्रमांक MP 48 ML2695 यांचा जोरदार अपघात झाल्याने यामध्ये पती-पत्नी व मुलगी यांचा जागीच दुर्दैवी झाल्याची घटना घडली.
(ads)
या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी डंपर चालकास चांगला चोप दिला. सदरील डंफर बी. एन. अग्रवाल यांचे असल्याची माहिती समोर येत आहे. अशाच प्रकारे डंपर चालक बेसावधपाने सुसाट जोरात डंपरची वाहतूक करताना या रस्त्यावरून नेहमीच दिसत असतात असे नागरिकांमधून बोलले जात आहे यावर प्रशासनाने वेळीच चाप बसवण्याची गरज आहे.