यावल (सुरेश पाटील)
प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या लोककल्याण मेळावा उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून यावल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
(ads)
हा कार्यक्रम दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.लोककल्याण मेळावा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नगरपरिषदेच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून यात या कार्यक्रमात पतविक्रेत्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे, नागरिक व पथ विक्रेत्यांसाठी विविध उपयुक्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
(ads)
प्रशिक्षण सत्रात भारतीय अन्न पदार्थ व मानांक प्राधिकरण (FSSAI) चे तज्ज्ञ रामेश्वर राजू यांनी उपस्थित पथ विक्रेत्यांना व्यवसाय करताना कोणत्या नियमांचे पालन करावे, शासनाकडून कोणती प्रमाणपत्रे मिळवावीत,तसेच अन्नपदार्थ विक्रीदरम्यान स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
(ads)
या प्रसंगी यावल नगरपरिषद कार्यालय अधीक्षक विशाल काळे आणि पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी गजानन महाजन यांनी केले,तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय संघटक सीमा दैवे, शहर समन्वयक स्नेहा रजाने, CRP जमीला तडवी, शिपाई नितीन पारधे यांनी विशेष परिश्रम घेतले.
(ads)
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय अधिक शिस्तबद्ध व स्वच्छतेच्या दृष्टीने उभारण्यास अशा प्रकारचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.