17 सप्टेंबर 2025रोजी जिल्हास्तरीय शेतकरी जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : माजी खासदार उन्मेश पाटील

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील ) बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव येथे जिल्हास्तरीय शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन माजी खासदार उमेश पाटील यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केले आहे यासाठी त्यांनी शुक्रवार दि.१२ रोजी यावल येथील यावल तालुका जिनिंग प्रेस सभागृहात केळी उत्पादक व इतर सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली.

(ads)

केळी पिकाला योग्य भाव नाही, केळी विमा मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार,या सर्व प्रकरणात राज्य सरकार मात्र गप्प. तेव्हा राज्य सरकारला जागे करण्यासाठी जळगावत आयोजित शेतकरी जन आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले. ते यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात आयोजित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.

(ads)

जळगाव येथे येत्या १७ सप्टेंबर रोजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चात सहभागी होण्याकरिता केळी उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी माजी खासदार उन्मेश पाटील हे आले होते.या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, सध्या केळी उत्पादक शेतकरी हा प्रचंड संकटात आहे. शेतकऱ्यांच्या केळीला भाव नाही. त्याचप्रमाणे केळी विम्यामध्ये देखील मोठ्या प्रकारात प्रमाणात गैरव्यवहार झाले आहे.शेतकरी कष्ट करून पीक उभे करतो, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक नष्ट होते. मात्र, विमा कंपनी देखील यावेळी शेतकऱ्यांना साथ देत नाही. केळीला योग्य भाव नाही आणि राज्य सरकार देखील गप्प आहे. तेव्हा सरकारला जागे करण्यासाठी मोठ्या संख्येत केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी शेतकरी जन आक्रोश मोर्चा सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

(ads)

या बैठकीमध्ये माजी आमदार रमेश चौधरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील,सेना उबाठा शहर प्रमुख जगदिश कवडीवाले,साकळी सरपंच दीपक पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,सारंग बेहडे, भगतसिंग पाटील सह मोठ्या संख्येत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.स्वंयचलीत हवामान केंद्रांचा दोष.प्रत्येक्षात अनेेक शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान होवुन देखील चुकीच्या ठिकाणी स्वयंचलीत हवामान केंद्र उभारल्यामुळे त्यात नोंदी झाल्या नाही व हा प्रकार महसुल विभागाकडून विमा कंम्पनीस कळवून देखील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही. दोष स्वयंचलीत हवामान केंद्राचा मात्र, नुकसान शेतकऱ्यांचे झाले या बाबत राज्य सरकार देखील गप्प असे प्रसंगी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगीतले तेव्हा शेतकऱ्याच्या हक्का करीता या मोर्चात सहभागाचे आवाहन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!