विद्यार्थ्यांसाठी यावल नायगाव मार्गे जळगाव बसच्या वेळेत बदल करून दुसरी एसटी बस सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

यावल  ( सुरेश पाटील )

विद्यार्थ्यांसाठी यावल नायगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या एसटी बसच्या वेळेत बदल करून दुसरी एक एसटी बस सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.


यावल आगार प्रमुख महाजन यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की यावल,विरावली, दहिगाव,सावखेडासिम,नायगाव, किनगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या सकाळच्या एसटी बसच्या वेळेत बदल करून दुसरी बस सुरू करावी अशी मागणी आहे.

(ads)

 यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांच्याकडे निवेदन देण्यात आले. वरील परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावमध्ये ये-जा करतात. परंतु सध्या सकाळची बस उशिरा पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे केवळ शैक्षणिकच नव्हे,तर पालकांचे आर्थिक नुकसानही होत आहे.विद्यार्थ्यांना वेळेत शिक्षणासाठी पोहोचता यावे म्हणून बसची वेळ लवकर करण्याची आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता सकाळच्या वेळेत दुसरी अतिरिक्त बस सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

(ads)

निवेदन देताना मनसे जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, किशोर नन्नवरे,तालुका उपाध्यक्ष उदय पाटील,पंकज कोळी,कुणाल पाटील आणि दुर्गेश कोळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांसाठी एसटी बसची सुविधा तत्काळ उपलब्ध न केल्या मनसे आंदोलनात्मक भूमिका घेईल,असा इशाराही आगार प्रमुख यांना देण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!