जळगावात नोव्हेंबर मध्ये ' राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे ' आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव शहरात येत्या २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . तयारीसाठी आज रविवारी जळगाव जिल्ह्यातील महिलांची विशेष सभा घेण्यात आली.

      सभेच्या अध्यक्ष स्थानी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे होते त्यांनी सभेला संबोधित करताना सांगितले की, भारतीय संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून, देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी देणारे जीवनमूल्य आहे. “संविधान सन्मान संमेलनाचा उद्देश समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाच्या मूल्यांशी जोडणे आणि त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी जनजागृती करणे हा आहे,” असे त्यांनी नमूद केले. 

  (ads) 

     प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात संविधानासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला. “आजच्या काळात संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना अनेक आव्हाने आहेत. सामाजिक असमानता, जातीयवाद, आणि आर्थिक विषमता यामुळे संविधानातील समता आणि न्यायाच्या तत्त्वांना धोका निर्माण झाला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे मांडले. त्यांनी उपस्थित महिलांना संमेलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.

   (ads) 

     प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाची गरज आणि त्याची रूपरेषा सादर केली. “संविधान हे आपल्या देशाचे प्राणवायू आहे. मात्र, त्याची खरी ताकद तेव्हाच दिसते जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या मूल्यांशी जोडली जाते. हे संमेलन सर्वसमावेशक असेल, ज्यामध्ये महिला, युवा, शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचा सहभाग असेल,” असे त्यांनी सांगितले. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी प्रास्ताविक भारती रंधे यांनी तर आभार प्रदर्शन निरंजना तायडे यांनी केले .

  (ads) 

      सभेत उपस्थित महिलांनी संमेलन सर्वसमावेशक व्हावे, यासाठी आपल्या सूचना मांडल्या. त्यांनी महिलांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या हक्कांना संमेलनात प्राधान्य देण्याची मागणी केली. तसेच, ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचनाही केली. 

(ads) 

    पुष्पा साळवे,मंगला बोदोडे , पूजा साळवे, हेमा बावस्कर,श्वेता मेश्राम,रंजिता तायडे,रत्नमाला बि-हाडे,संध्या तायडे ,राधिका जावरे, कविता सपकाळे,सुनंदा वाघ,सरजू जाधव, संघमित्रा शिंगारे,शीला सुरवाडे,कुसुम सोनवणे,वंदना सोनवणे, मीराताई वानखेडे, राजश्री सोनवणे,दीपमाला सुरवाडे,संगीता मोरे,कल्पना ब्राम्हणे,कमल ढिवरे , कुसुम सोनवणे , सखुबाई जाधव आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या. 

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप सपकाळे , महेंद्र केदारे यांनी परिश्रम घेतले .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!