मालेगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आयशानगर पोलीस ठाणे गुरनं ७२/२०२५ भा.न्या.सं. कलम १०३ (१), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दि. २१/०९/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील आयशानगर हद्दीत फैजान शेठ यांचे लुम कारखान्यासमोर मयत नामे मोहमद मतीन मोहमद मोबीन, वय १९, रा. इद्यु मुकादम चौक, रमजानपुरा मालेगाव यास दोन अज्ञात इसमांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून, त्यास शिवीगाळ दमदाटी करून लोखंडी धारदार कोयत्याने छातीवर डाव्या बाजुस वार करून जखमी करून जिवे ठार मारले बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(ads)
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग श्री. सिध्दार्थ बरवाल यांनी सदर गुन्हयातील आरोपीतांना तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आयशानगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर गुन्हयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना विचारपुस करून, यातील आरोपीतांचे वर्णन व बोलीभाषेवरून तपासाची चक्रे फिखुन खालील संशयीतांना शिताफिने ताब्यात घेतले.
(ads)
१) सैय्यद वसीम सैय्यद सलीम उर्फ वस्या, वय २१, रा. सर्व्हे नं.४२, आयशा अमीर हॉल जवळ, मालेगाव २) रईस अहमद सईद अहमद उर्फ रईस काल्या, वय १९, रा. हबीब हॉटेलच्या मागे, जाफरनगर, मालेगाव
यातील ताब्यात घेतलेले वरील दोन्ही संशयीतांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळून यातील मयत नामे मोहमद मतीन मोहमद मोबीन याचेसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून, कुरापत काढून लोखंडी कोयत्याने त्याचे छातीवर वार करून जिवे ठार मारले असलेबाबत कबुली दिली आहे. यातील आरोपीतांविरूध्द यापुर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास आयशनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. गौतम तायडे हे करीत आहे.
(ads)
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग श्री. सिध्दार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, आयशानगर पो.स्टे. चे प्रभारी सपोनि गौतम तायडे, सपोनि संभाजी पाटील, सपोनि संजयकुमार सोने, पोउनि राजु पगारे, पोलीस अंमलदार मोरव्हाळ, देवरे, निकाळे, सोनवणे, मोरे, पवार, तसेच स्थागुशाचे पथकातील पोहवा सुभाष चोपडा, दत्ता माळी यांचे पथकाने सदर खुनाचा गुन्हा ०४ तासाचे आत उघडकीस आणुन कारवाई केली आहे.