रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जय वीर भगतसिंग व्यायामशाळेमार्फत बसविण्यात आलेल्या भोईवाडा येथील दुर्गा उत्सवानिमित्त दुर्गा देवीचे चांदीचे दागिने व शस्त्रे सवाद्य मिरवणूक काढून चढविण्यात आले.
सदर मंडळाची स्थापना सन 1995 मध्ये झालेली असून सन 1997 पासून चांदीचे दागिने व चांदीची मूर्ती ठेवण्याचे काम या मंडळाने केलेले आहे सदर दागिन्यांमध्ये दरवर्षी काही ना काही प्रमाणामध्ये चांदीची वाढ करण्यात येते हे विशेष आहे.
(ads)
चांदीचे दागिने व शस्त्र घडविण्याचे काम अलंकार बोरकर व त्यांचे वडील सुरेशराव बोरकर यांनी अत्यंत सुबकरित्या केले आहे अलंकार ज्वेलर्स येथून डॉ रवींद्र वानखेडे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन डॉ संदीप पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे ,चेतक गिनोत्रा संतोष अग्रवाल सूर्यकांत अग्रवाल दीपक नगरे डॉ सुरेश महाजन अजय पाटील नितीन महाजन मोतीराम खटवाणी अजय पाटील बाळकृष्ण महाजन बी एस पाटील शैलेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
(ads)
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोपाल भोई यांच्यासह संजय भोई संतोष भोई देव विकास भोई ईश्वर भोई राम लखन भोई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते