जळगाव जिल्ह्यातील महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या व गंभीर समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असून, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे
(ads)
शिष्टमंडळात राज्यस्तरीय मान्यवर
या चर्चेसाठी राज्य व विभागीय पातळीवरील वरिष्ठ पदाधिकारी जळगावात दाखल होणार आहेत. शिष्टमंडळात भाऊसाहेब पठाण, राज्याध्यक्ष,राज्य सरकारी गट-ड चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,मुंबई ज्ञानेश्वर कासार राज्य सरचिटणीस,महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य डी.एम.अडकमोल जिल्हाध्यक्ष,महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना,जळगाव रवींद्र तायडे नाशिक विभागीय अध्यक्ष,कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांचा समावेश असून
(ads)
हे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होणार आहेत.चर्चेकडे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष या चर्चेमध्ये जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याची शक्यता असल्याने सर्वच महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचे आणि जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित राहतील,राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ जळगाव जिल्हा यांचे २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष वेधून आहे.