यावल ( सुरेश पाटील )
येथील बाल संस्कार बालवाडी व बालसंस्कार विद्या मंदीर व बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात आज सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी यांनी सपत्नीक पुजा करून तीन दिवसीय शारदा मातेची भव्य मिरवणूक मेन रोडने काढून शारदा देवीची स्थापना शाळेत मोठ्या उत्साहात केली.परंतु संध्याकाळी घटस्थापनेच्या वेळेस संपूर्ण यावल शहर अंदाजे दीड तास अंधारात राहिल्याने अधिकाऱ्यांच्या शून्य नियोजन कारभारामुळे भाविक भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
(ads)
अगोदर श्रीहरी कवडीवाले यांच्या घरापासून शहराच्या मुख्य रस्त्यावरून शारदा मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यात शाळेच्या लहान - लहान विद्यार्थ्यांनी विविध कला पथकांद्वारे आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले यात झांज,लेझीम,दांडिया व कळशी पथकांचा समावेश होता . शहरातील लोकांनी लहान मुलांच्या वेशभुशांचे व कला गुणांचे खुप कौतुक केले.
(ads)
मिरवणूक यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी प्राथमिक मुख्याध्याक सुनिल माळी,माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे,बालवाडी मुख्याध्यापिका शरयु कवडीवाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
(ads)
ऐन संध्याकाळी घटस्थापनेच्या वेळेस वीज वितरण कंपनीच्या यावल येथील सबस्टेशन मधील सिस्टीममध्ये समस्या निर्माण झाल्याने संध्याकाळी एक ते दीड तास ( ७:१० वाजेपर्यंत ) यावल शहराचा वीस पुरवठा खंडित झाल्याने ऐन घटस्थापनेच्या वेळेस अंधार झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय नियोजनामुळे संपूर्ण यावल शहरातील नागरिकांमध्ये भाविकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.