https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात :३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात :३० विद्यार्थी जखमी, तीन जण गंभीर जखमी

सकाळी शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला. वाल्हेरीहून तळोदाच्या दिशेने जात असलेली बस पलटी झाल्याने अपघात झाला.

यात बसमधील २५ ते ३० विद्यार्थी जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल झाले आहेत. (ads)

नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाल्हेरी येथे मुक्कामी बस असल्याने या बसने रोज विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जात असतात. त्यानुसार आज देखील वाल्हेरी येथून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण ६.३० वाजता निघाली होती. या बसमध्ये ७० ते ७५ विद्यार्थी प्रवास करत होते.(ads)

तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

दरम्यान गावातून बस मार्गस्थ झाल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर बस भवर फाट्याजवळ पोहचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी होऊन बसला अपघात झाला. या अपघातात २५ ते ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर जखमीतील ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(ads)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!