रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्याने रावेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी महायुती सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे हार्दिक आभार मानण्यात आले. (ads)
रावेर-यावल मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार अमोल दादा जावळे यांचे कार्यकर्त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.या आनंदोत्सवात ज्येष्ठ नेते सुरेश दादा धनके, गोमतीताई बारेला, पद्माकर भाऊ महाजन, सुनील भाऊ पाटील, सी. एस. पाटील सर, नितीन भाऊ पाटील, अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, रविभाऊ पाटील, दुर्गेश पाटील, अजबराव दादा पाटील, धनलाल पवार, सिकंदर तडवी, संदीप सावळे, निलेश सावळे, (ads) शुभम पाटील, रवी महाजन, स्वप्निल सोनवणे, नंदकिशोर चव्हाण, जगदीश पाटील, राहुल महाजन, सनी पाटील, उमाकांत महाजन सर, पवन पाटील, जयंत कुलकर्णी सर, जयेश पाटील, गोंडू महाजन पाटील, सोपान दादा पाटील, जगदीश घेटे, कपिल पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उत्स्फूर्त उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी“मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.