रावेर येथील शासकीय विश्रामगृह येथे आज परिवर्तन शिक्षक परिवारातर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोकरी येथील उपक्रमशील शिक्षक श्री. लतीफ तडवी सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. साहेबराव शिंदे साहेब होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरदार जी.जी. हायस्कूल रावेर येथील उपमुख्याध्यापक श्री.रमण तायडे सर , विवरे खुर्द येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. हर्षवर्धन तायडे सर,कुसुंबे येथे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.सायबु तडवी सर,प्रा.चतुर गाढे सर ,सबाज तडवी सर,कृष्णा धंदरे सर,अरमान तडवी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अविनाश बागुल सर यांनी मांडले तर आभार श्री.मुबारक तडवी सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी विकास सुरवाडे सर ,फिरोज तडवी सर, इस्माईल तडवी सर, अरबीन तडवी सर,मोहम्मद तडवी सर ,सम्राट निकम सर ,शरीफ तडवी सर यांनी मेहनत घेतली. यावेळी रावेर परिसरातील बहुसंख्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होती.