सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान योजने अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्र, ऐनपूर यांच्या सहकार्याने शेतकरी सहायता कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय शेतकरी सहायता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे अध्यक्ष पद श्री भागवत विश्वनाथ पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी भूषवले. कार्यशाळेचे प्रस्ताविक केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांनी केले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.नवीन बी. खंडारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, के. सी. आय. एल., कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या शुभहस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
(ads)
व्यासपीठावर प्रा. डॉ. पी. डी. पाटील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर अधिसभा सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव. ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष श्री रामदास नारायण महाजन, प्रमुख मार्गदर्शक डॉ. तुषार गोरे कृषी विज्ञान केंद्र, जळगांव, रोशनी जैन प्रकल्प समन्वयक के. सी. आय. एल., कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव, सचीन गायकवाड मंडळ कृषी अधिकारी, सावदा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने उपस्थित होते.
(ads)
प्रा. डॉ. पी. डी. पाटील अधिसभा सदस्य यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. पहिल्या सत्रात डॉ.नवीन बी. खंडारे यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादनांची कापनी नंतरची प्रक्रिया व विविध शासकीय साहाय्य यंत्रणानांची माहिती देऊन आजच्या काळात उच्च तंत्रज्ञानयुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे असे प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात रोशनी जैन प्रकल्प समन्वयक के. सी. आय. एल., कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांनी के. सी. आय. एल.,च्या माध्यमातून विविध उद्योगांच्या संधी व स्टार्टअप या विषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात डॉ. तुषार गोरे कृषी विज्ञान केंद्र जळगांव यांनी केळी प्रक्रिया व मुल्य वर्धनातून उद्योगाच्या संधी या विषयी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले, चौथ्या सत्रात सचीन गायकवाड मंडळ कृषी अधिकारी, सावदा यांनी शेती मालावरील प्रक्रिया उद्योग व शासकीय योजना या विषयांवर मार्गदर्शन केले.
(ads)
सर्व प्रमुख मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. मा. श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासनातील अधिकाऱ्यांनी व संशोधन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेती मालावरील प्रक्रिया उद्योगासंबंधी एखादा पायलट प्रोजेक्ट राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. एकूण ११७ शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.
(ads)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी केले व आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी मानले; कार्यशाळेस सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.