जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भारतीय बौद्ध महासभेचा जनआक्रोश मोर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

    जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जनआक्रोश भारतीय बौद्ध महासभेचा मोर्चा

जळगांव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक १८/०९/२५ गुरुवारी रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून भारतीय बौद्ध महासभा चे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नैतुत्वात खालील मागणी करीता देशात "मंत्रालय व सर्व जिल्हा कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आले.

   त्यानुसार जळगांव जिल्ह्यात सुद्धा जिल्हा कार्यालयावर "जन आक्रोश मोर्चा " काढण्यात आला.

(ads)

 काय होत्या मागण्या- 

  • - बोधगया महाबोधी महाविहार (बिहार) चे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संप्रदायाकडे सुपूर्त करण्यात यावे, अशी प्रथम मागणी करण्यात आली आहे.
  • - महू (मध्यप्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवरील स्मारकाचे संपूर्ण व्यवस्थापन "दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला द्यावे, अशी दुसरी मागणी आहे.
  • - नागपूर येथील दीक्षाभूमीचे सर्वाधिक अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशजाकडे आणि बौद्ध अनुयायांकडे सुपूर्त करण्याची तिसरी महत्वाची मागणी आहे.

- या मागणी करीता राज्यातील विविध संघटना च्या प्रमुख पदाधिकारी, संघटक व समित्यांचे पाठिंबा दर्शविला आहे.

- तसेच संबंधित मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना संबोधून ह्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

(ads)

- भारत सरकार, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश सरकार, तसेच महामहिम राष्ट्रपतींनाही ही प्रेस नोट व मागण्यांचे निवेदन पाठवले जाणार असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे

- मागण्यांमध्ये राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बौद्ध समाज व अनुयायांचा न्याय करावा, असे आवाहन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

सदर भारतीय बौद्ध महासभेची ऐतिहासिक दृष्ट्या व सामजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून समाजाकरीता महत्वाची लढाई असल्यामुळे मोठ्या प्रमाणात समाज बांधवा सह विविध संघटनानी मोर्च्याला पाठिंबा जाहीर करून सहभागी झाले होते. 

(ads)

मोर्च्यात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक के.वाय.सुरवाडे, महिला राज्य संघटक लता तायडे,जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, सरचिटनिस सुशीलकुमार हिवाळे , हिशोब तपासणीस सुमंगल अहिरे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रियांका अहिरे, सरचिनीस वैशाली सरदार, वंचित च्या जिल्हा अध्यक्षा शमीभा पाटील , सुमित्र अहिरे बामसेफ,मधुकर पगारे पश्चिम अध्यक्ष ,कर्नल रमेश साळवे, आंबेडकर व्हॉईस मिडिया फोरम चे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, प्राजक्ता तायडे , सीमा अहिरे, वनमाला हिवाळे,मंगलाताई सोनवणे पश्चिम महिला अध्यक्ष, रवींद्र मोरे, बी.डी.बोदडे, राजेश इंगळे, प्रीतीलाल पवार,विजय भोसले, वसंत लोखंडे, विजय अवसरमल, बी. डी. महाले सर, राजेंद्र अटकाले, चंद्रकांत इंगळे, उत्तम सुरवाडे,शांताराम मोरे,लक्ष्मी मकासरे, विश्वनाथ मोरे, संभाजी सोनवणे, श्रावण साळुंखे, वनिता साळवे यांच्या सह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जन आक्रोश मोर्चाने जळगाव शहर दणाणले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!