यावल ( सुरेश पाटील )
यावल येथील भुसावळ रोडवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील खातेदार मयत झाला असता बँकेतर्फे काढण्यात आलेल्या २ लाख रुपये रकमेचा विमा धनादेश वारसाला देण्यात आला.
(ads)
याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतर्फे ब्रँच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे यांच्याकडून मयताचा वारस असलेल्या लता पितंबर चौधरी व दिपक चौधरी सुंदर नगरी यावल यांना २ लाखाच्या धनादेश वाटप करण्यात आला. मयत व्यक्ती सुनील पितांबर चौधरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खाते होते त्यांनी एलआयसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ४३६ रुपयाचा वार्षिक विमा काढलेला होता.त्याचे अल्पसाधारण निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसाला २ लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला .
(ads)
त्याप्रसंगी ब्रांच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे,असिस्टंट मॅनेजर वैशाली नगराळे,जानवी खोडे तसेच रोखपाल चेतनसिंह राजपूत, मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे भूषण महाजन,बँक सखी अश्विनी कोळी उपस्थित होते.