आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर कामाला केराची टोपली! खिर्डी बु! येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सुशोभिकरण एक वर्षा पासून प्रलंबित..
रेंभोटा/प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणाचे कामं हे एक वर्षापासून अपूर्ण स्थितीत सोडून ठेकेदार पसार..
सविस्तर वृत्त असे की खिर्डी बु! डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभिकरण हे काम आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 23/24 अंतर्गत मध्ये मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून तसेच तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मार्च 2024 मध्ये मिळून सुद्धा संबंधित इंजिनिअर/ठेकेदार यांनी कामाला उशीर केला. तसेच वर्ष अखेर महिन्यात कामाला सुरवात करण्यात आली त्याच पुढील 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवसापूर्वी तरी काम पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्व स्थानिक समाज बांधवांची होती परंतु त्या दिवशी पण संबंधित ठेकेदार/इंजी.यांनी समाज बांधवांचा भ्रम निराश केला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व आक्रोश व्यक्त करण्यात आला.
(ads)
त्यामुळे समाज बांधवांची आक्रमक भूमिका बघता ठेकेदार यांनी धातुर मातुर देखावा दाखवून चालू झाल्याचे भासवून पुन्हा काम संथ गतीने सुरू ठेवण्यात आले.
आजपावेतो पर्यंत सप्टेंबर 2025 उजाडले असून एक वर्ष होत आले.पण काम अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही. तसे पाहिले तर साधरण काम हे जास्तीत जास्त दोन ते महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते.
(ads)
परंतु संबंधित इंजी/ठेकेदार हम करे सो कायदा .... करत असल्याचे निदर्शनात येत आहे.यावरून असं दिसतंय की आमदार यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामाला पण ठेकेदार केराची टोपली तथा खो दिल्याचे दिसून येत आहे.
(ads)
प्रतिक्रिया...
संबंधित ठेकेदार/इंजी यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारले असता काम पूर्ण झाल्याचे सांगितले.परंतु प्रत्यक्षात काम अपूर्ण स्थितीत सोडून संबंधित ठेकेदार पैसे काढून मोकळे झाल्याचे दिसून येत आहे.तसेच हा आमदार स्थानिक विकास निधी चा अपव्यय असून शासकीय निधीचा गैरवापर आहे. याकडे आमदार महोदय यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.
सामाजिक कार्यकर्ते...
विनायक जहुरे _खिर्डी बु!