बालसंस्कार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.व्ही.आर.वाणी ( सर ) यांचा ८ वा स्मृतिदिन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल  ( सुरेश पाटील )

येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व.आप्पासाहेब उर्फ व्ही.आर.वाणी (सर )यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात दि.१९ सप्टेबर २०२५ रोजी चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस.सोनवणे सर व चंद्रकांत वाणी हे उपस्थित होते . पाहुण्यांनी संस्था अध्यक्ष स्व.व्ही. आर.वाणी ( सर ) यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जाणीव करून उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांच्या महान कार्याची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. 

(ads)

गटागटातून विजयी विद्यार्थी

इयत्ता १ ली २ री गट चित्रकला स्पर्धा १) दीक्षा विजय गजेश्वर 

२) मानसी उमाकांत चौधरी ३) सिद्धी अशोक बारी वक्तृत्व स्पर्धा

१) रिद्धी पंकज गडे २) मोक्षद निलेश इंगळे ३) संचिता वसंत सोनवणे इयत्ता ३ री ४ थी गट

 चित्रकला स्पर्धा १) मीनल प्रशांत बारी,२) हंसिका राजेश गायकवाड 

३) तेजल मुरलीधर चौधरी वक्तृत्व स्पर्धा १) दिव्यानी नरेंद्र बारी २) अभिज्ञ दिनेश मुळे ३) प्रतीक किशोर पाटील.

इयत्ता ५ वी ते ७ वी गट चित्रकला स्पर्धा १) राधिका गणेश वाणी 

२) भूमिका अनिल उंबरकर ३)समर्थ दीपक गडे 

 वक्तृत्व स्पर्धा.१) सानवी पंकज गडे २) जान्हवी अतुल पवार 

३) स्वराली सुरेश तायडे 

या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसव व शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

(ads)

स्मृतिदिन समारंभ संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर अतुल गर्गे सर शरयू कवडीवाले मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.पंढरीनाथ महाले सर यांनी आभार व्यक्त केले तर प्रशांत महाजन सर यांनी सूत्रसंचालन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!