रावेर( सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार रावेर तालुक्यात " सेवा पंधरवडा "कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती रावेर तहसीलदार बंडू कापसे यांनी आज दिनांक 12सप्टेंबर 2028 रोजी रावेर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे हे सुद्धा उपस्थित होते.
(ads)
दि.१७ ते २२ सप्टेंबर २०२५ , दि.२३ ते २७ सप्टेंबर,आणि दि.२८ ते २ ऑक्टोबर २०२५ अशा तीन टप्प्यांमध्ये रावेर तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम,जिवंत सातबारा,जिवंत रेशन कार्ड,शेत सुलभ योजना,पानंद रस्ते, दफनभूमी / स्मशानभूमी, महासमाधान शिबिर,शेतकरी आत्महत्या कुटुंब यांना सर्व लाभ देणे,महाविद्यालयीन शिबिरे घेऊन दाखले वितरण कार्यक्रम.वर्ग २ ते वर्ग १ रूपांतरण,सामाजिक अर्थसहाय्य योजना मुद्दा क्रमांक ११ नुसार कार्यवाही करणे. तसेच 6620 शेतकऱ्यांचे 2700 सातबारा उतारे दुरुस्त केले.
(ads)
सात बारा वरील इतर हक्कामधील तुकडेबंदी कायद्याचा बेकायदा व्यवहार हे शेरे कमी केले.यामुळे लोकांना कर्ज कामी मदत होणार आहे. 100 % आयुष्य मान कार्ड तयार करणे,इत्यादी सेवा पंधरवाडा साजरा करण्याचे नियोजन रावेर तहसीलदार बंडू यांनी केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.