साकळी ते यावल ओबीसी बांधवांचा बाईक रॅली मोर्चा : सरकारने मराठा आरक्षणासाठी ओबीसींचे आरक्षण न तोडण्याची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील विविध मागासवर्गीय समाज बांधवांनी आज शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात मोटर सायकल रॅली काढून राज्य सरकार विरोधात आपला संताप व्यक्त करीत खऱ्या ओबीसी बांधवांना, समाजाला राजकीय न्याय कसा मिळेल असे नमूद करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव यांनी काढलेला जीआर त्वरित रद्द करावा याबाबतच्या मागणीचे निवेदन यावल तहसीलदार यांना सादर केले. 

(ads)

तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना श्री संत सावता महाराज समस्त माळी समाजातर्फे निवेदन देण्यासाठी तालुक्यातील साकळी येथून निघालेली मोटरसायकल रॅली यावल तहसील कार्यालयावर आणून निवेदन देऊन समारोप करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैद्राबाद गॅझेटच्या आधारे मागणी करण्यात येत आहे. परंतु हे गॅझेट रद्द करून, इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावर कुठलाही गदा येऊ नये,अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली. "सरकारने ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करावे,आणि त्यांना मिळणारे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत कमी करू नये," असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

(ads)

या निवेदनावर माळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भास्कर महाजन,बडगुजर समाजाचे सुनिल बडगुजर,माळी समाजाचे शाम वसंतराव महाजन,किरण मधुकर महाजन,साहेबराव मोतीराम बडगुजर,परमानंद वसंत बडगुजर, अरविंद निळे,मोहन काशिनाथ बडगुजर,तुकाराम महाजन,मुकेश बोरसे,भिका महाजन,प्रवीण महाजन,जयंत बोरसे,यावल येथील नितीन सोनार,यांच्यासह सर्व इतर मागासवर्गीय समाज बांधव व किनगावसह परिसरातील इतर मागासवर्गीय समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(ads)

मोठ्या संख्येने युवक व समाज बांधवांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. "ओबीसी आरक्षण धोक्यात घालून कुणालाही वेगळे आरक्षण देणे मान्य होणार नाही," अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला.

यावल तालुक्यातील या मोर्चामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात सुरू असलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने दाखवलेली एकजूट लक्षणीय मानली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!