न.प.निवडणूक चक्रव्यूहात विरोधकांचा अभिमन्यू होणार...!
यावल ( सुरेश पाटील ) यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या घरगुती वातावरणात मोठ्या उत्साहात आणि दणक्यात साजरा करण्यात आला.अतुल पाटील यांचा लोकप्रिय जनसंपर्क आणि त्यांच्या राजकीय,सर्वस्तरीय समाज बांधवांना विश्वासात घेऊन काम करण्याचे हातोटी लक्षात घेता त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर यावल शहरासह,
तालुक्यातून,जिल्ह्यातून प्रत्यक्ष तथा भ्रमणध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
नगरपरिषदेच्या माध्यमातून यावल शहराचा कायापालट करण्याची क्षमता माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांच्यात असल्याची आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जाती धर्माच्या हितचिंतक, मित्रमंडळी,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा वरून प्रत्यक्ष दिसून आल्याने यावल नगरपरिषद निवडणुकीत राजकीय चक्रव्यूहात त्याच्या विरोधकांचा "अभिमन्यू" होणार असल्याचे निश्चित आहे.
सध्या राज्यातील राजकीय स्तरावरील हालचाली लक्षात घेता अनेक जिल्हास्तरीय,विधानसभा क्षेत्रीय,तालुकास्तरीय पदाधिकारी हे आपल्या स्वतःसह विकास कामे मिळविण्यासाठी रांगेत उभे आहेत.
परंतु अतुल पाटील हे आपल्या ध्येय उद्दिष्टानुसार राजकीय पक्षाला सोडणार नसल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले आहे.त्यामुळे यावल नगर परिषदेत त्यांना मिळालेल्या अल्प कालावधीच्या कार्यकाळातील त्यांच्या विकास कामाचा आढावा लक्षात घेता यावल शहरातील सर्व स्तरातील ५० ते ६० टक्के जनमत त्यांच्या पाठीशी असल्याने नगरपरिषद निवडणूक त्यांच्या चक्रव्यूहात मात्र त्यांच्या विरोधकांचा "अभिमन्यू "होणार असून निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यासह एकूण १० ते १३ सदस्य एक विचाराचे आणि अतुल पाटील यांच्या शब्दाला मान देणारे निवडून येणार असल्याची चर्चा यावल शहरात आहे.