यावल ( सुरेश पाटील ) दि. १७ रोजी यावल तहसील तर्फे तालुक्यातील चिखली बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अंतर्गत सेवा पंधरवडा समाधान शिबिर प्रांताधिकारी बबनराव काकडे,यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर,गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, चिखली व म्हैसवाडीचे सरपंच, निवासी नायब तहसीलदार बी.एम. पवार महसूल नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या खास उपस्थितीत संपन्न झाले.
उपस्थित ग्रामस्थांना सेवा पंधरवडा मधील तीन टप्प्यां बाबत माहिती देण्यात आली असून शेत पानंद रस्ते कार्यपद्धती शेत रस्त्यांना नंबर देणे, सर्वांसाठी घरे आणि नाविन्यपूर्ण योजना याबाबत माहिती देऊन विविध सेवा लाभ वितरित करण्यात आले.तसेच या शिबिरांतर्गत चिखली बुद्रुक या गावातील चिखली बुद्रुक ते भालोद रस्ता याचे शिवार फेरी ग्रामस्थांच्या समवेत करण्यात आली.