यावल ( सुरेश पाटील )
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित यावल येथील मनोकामना लोकसंचालीत साधन केंद्र यांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्सवात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी मा.आ.अमोलदादा जावळे होते. मार्गदर्शन करताना सांगितले कि बचत गटासाठी बहिणाबाई मॉल व सभागृह लवकरच यावल शहरात उभे करण्यात येईल.
(ads)
वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार जावळे यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या या कार्यक्रमात अर्चना आटोळे महिला व बाल विकास अधिकारी यांनी बालविवाह महिला अत्याचार याविषयी मार्गदर्शन केले प्रतिक पाटील संरक्षक महिला कायदे कायदेशीर प्रक्रिया यावर यांनी मार्गदर्शन केले,शैलेश पाटील विभागीय सल्लगार माविम शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले.सुमेध तायडे जिल्हा समन्वयक अधिकारी माविम जळगाव शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले ललित तावडे उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी उद्योग विषयी मार्गदर्शन केले,युनुस तडवी पेसा समन्वयक यांनी महिला उद्योजक कसे बनावे मार्गदर्शन केले,वसंत संदानशिव समुपदेशक यांनीही आरोग्य विषयी मार्गदर्शन केले, सचिन बर्डे यांनीही शासकीयबँक विमा बाबत माहिती दिली.
(ads)
यावेळी युवराज पाटील amo माविम सतीश साळुंके dpc माविम जळगाव ,परेश गाडे लेखाधिकारी माविम जळगाव निर्मला पाटील अध्यक्ष मनोकामना cmrc ज्योती पाचपांडे सचिव मनोकामना cmrc , हेमन्त फेगडे ldc यावल, नितीन कुलकर्णी, सलीम तडवी, चोपडा जयश्री खोडपे जळगाव, मिना तडवी रावेर, छाया चव्हाण सावदा हे उपस्थित होते या सभेत सर्व शासकीय योजना बाबत माहिती देण्यात आली व नविन उद्योग उभे करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
(ads)
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शारदा पाटील सहयोगिनी यांनी प्रस्थावना आशिष मोरे यांनी मांडली तसेच आभार प्रदर्शन जावेद तडवी यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया कोळी,वंदना पाटील,अलका बाविस्कर,राजश्री पाटील,पंकज बागुल,रंजना अहिरे, व सर्व crp यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यकारणी व बचत गटातील असंख्य महिला उपस्थित होत्या.