जळगाव जिल्ह्यात सतत पाऊस, अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर यामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान, मनुष्यहानी झाल्याने खानदेश पॅकेज जाहीर करण्याची आबा पाटील यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

जळगाव जिल्ह्यातील माहे सप्टेंबर २०२५ मधील बोदवड तालुक्या सह सर्व जिल्हाभर सतत पाऊस,अतिवृष्टी पूर हानीतील शेत पिकांच्या,मनुष्य नुकसान भरपाई साठी "खान्देश पॅकेज" जाहीर करा अशी मागणी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली.

(ads)

बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा सांगून प्रमुख मागण्याची माहिती देऊन शेतकऱ्यांसाठी खास खानदेश पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली. 

(ads)

बोदवड तालुक्यात सर्वच गावात सततचे पाऊस,अतिवृष्टी ,वादळ वाऱ्यात कापूस,मका,तूर,केळी,सोयाबीन,लिंबू नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे.महायुती सरकारचे अफलातून दोन शासन निर्णयांतील कमी दराने नुकसान भरपाई न देता,शासन निर्णय १ जानेवारी २०२४ मधील निर्गमित नुसार नैसर्गिक आपत्तीत नुकसानी प्रमाणे वाढीव दराने भरपाई मिळावी. संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी.

महायुती सरकारने पीक विमा योजनेतून "नैसर्गिक आपत्ती" हा महत्वाचा "ट्रिगर " काढून पीक विमा भरपाईचा "आत्माच" महायुती सरकारने काढल्याने शेतकरी नाराज होऊन हवालदिल झाले आहेत. 

(ads)

या अतिवृष्टी पूर परिस्थिती मधे मुक्ताईनगर,पाचोरा,जामनेर, भडगाव तालुक्यात नदीकाठच्या सर्वच गावात जनावरे,घरे,गोठे वाहून गेली आहेत.त्यांचे नुकसान भरपाई सह पुनर्वसन होणे महत्वाचे आहे.अतिवृष्टी,वादळ,पूर परिस्थितीत शेत जमिनी फळ पिके, खरीप पिकासह, पूर्णपणे खरडून गेल्याने त्या बाधित क्षेत्राचा भूसंपादन नियमाप्रमाणे आर्थिक मोबदला मिळावा.जळगाव जिल्ह्यातील सगळ्या प्रचंड अशा पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी साठी मोठ्या मदतीचे "खान्देश पॅकेज जाहीर करा.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) बोदवड तालुकाध्यक्ष आबा पाटील यांनी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!