ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या मार्फत विद्यार्थिनी आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन या कार्यालयाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटक व अध्यक्षपदी महाविद्यालयाचे मा प्राचार्य डॉ जे बी अंजने होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी यांनी उत्कृष्ट जीवनशैलीसाठी आरोग्य महत्वाचे असून, चागल्या आरोग्यासाठी व्यायाम, सकारात्मक विचार शैली महत्वाचे आहे असे सांगितले.
(ads)
या शिबिरात डॉ सचिन पाटील यांनी विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी केली व त्यांच्या आरोग्य विषयक शंकांचे निरसन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ सचिन पाटील यांनी नकारात्मक विचार सरणी मुळे आरोग्य विपरीत परिणाम होतात, तसेच मोबाईलच्या अती वापरामुळे सुद्धा आरोग्यावर परिणाम होतात असे सांगितले. म्हणून प्रत्येकाने सकारात्मक जीवनशैली अंगिकारावी असे सांगितले.
(ads)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रा हर्षा महाजन यांनी केले. या शिबिरात प्रा रेखा पाटील, युवती सभेच्या सचिव प्रा ऋतुजा पाटील, प्रा वैष्णवी पाटील, प्रा वैष्णवी डी पाटील, प्रा भारती पाटील, प्रा कोमल सुतार तसेच प्रा मिलिंद भोपे, प्रा केतन बारी, प्रा डी एन कोळी, प्रा प्रदीप तायडे, प्रा संकेत चौधरी, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहेते, डॉ व्ही एन रामटेके, प्रा एस पी उमारीवाड यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी साठी उंची मोजणे, वजन इत्यादी सुविधा साठी मदत केली व शिबिर यशस्वी साठी सहकार्य केले तर श्री श्रेयस पाटील, हर्षल पाटील यांनी मेहनत घेतली.