दीपनगर ता.भुसावळ : दिनांक ०४/०९/२५ रोजी भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्राने आपला ७६ वा वर्धापन दिन मोठ्या औचित्याने साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य अभियंता श्री राजेश मोराळे होते, ज्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या अधिकारी, विविध संघटनाचे प्रतिनिधी व मान्यवरांनी उपस्थित राहून हा खास सोहळा रंगवला. कार्यक्रमात एका वंचित घटकातील कंत्रादाराच्या कामाची विशेष दाखल घेण्यात आली. त्याबद्दल सर्वत्र चर्चा होती.
सदर साई कृपा इंजिनियर्स व कंत्राटदार संस्थेचे मालक श्री नारायण झटके यांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन मुख्य अभियंता श्री राजेश मोकळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या अथक मेहनतीमुळे व परिसरातील तक्रारींवर त्वरित उपाययोजना करून राखेची मोठ्या प्रमाणावर होणारी गळती यशस्वीपणे थांबवण्यात आली आहे.
भुसावळ केंद्रातील पेंटहाऊस मधील राखेच्या गळतीमुळे सभोतल परिसरात शेती व गावातील प्रदूषण वाढल्यामुळे पर्यावरणप्रेमी व स्थानिकांनी तक्रार केली होती. या समस्येवर कार्यवाही करीत असताना, नारायण झटके यांनी कमी खर्चात व जुनी साहित्य वापरून राखेच्या गळतीचे प्रभावी निराकरण केले. या कार्यामुळे परिसराचे पर्यावरण सुधारले असून, त्याचा मोठा परिणाम समोर आला आहे. या विशेष कामाबद्दल वरिष्ठांनी सुद्धा दखल घेऊन व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक यांनी मुख्य अभियंता राजेश मोराळे याचे सुद्धा कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात प्रभारी मुख्य अभियंता प्रकल्प संतोष वकारे, उप मुख्य अभियंता अशोक भगत व सुनील कुंभार, उप मुख्य औद्योगिक संबंधित अधिकारी मुकेश मेश्राम,अधीक्षक अभियंता चंद्रमणी, पखान, आणि अन्य विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी यांसह अनेक कंत्राटदार व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदार, उपाध्यक्ष प्रकाश तायडे, सचिव उस्मान पठाण , संतोष तेलंग, मनसाराम कोळी , रामचन्द्र तायडे आणि इतरानी नारायण झटके यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
हे उपक्रम भुसावळ वीज निर्मितीद्वारे पर्यावरणाची दक्षता व सामाजिक जबाबदारी याबाबत दाखवलेले उच्चतम उदाहरण मानले जात आहे.अखेर, या समारंभातून भुसावळ वीज निर्मिती केंद्राचा विकास व गुणवत्ता सेवेत झालेला प्रगतीचा उल्लेखनीय उच्छाद दिसून आला.



