यावल ( सुरेश पाटील )
पाचोरा तालुक्यातील मोजे कोकडी शिवारातील पोट खराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७ / १२ वर वहिवाट लावणे कामी पाचोरा येथील उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी वर्ग ३. गणेश बाबुराव लोखंडे वय २७ हा लाचखोर शासकीय कर्मचारी १० हजार रुपयाची लाच घेताना आज बुधवार दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव येथील लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पाचोरा पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने पाचोरा तालुक्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली.
(ads)
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांची पत्नी यांचे नावे मौजे कोकडी ता.पाचोरा शिवारात पोट खराब क्षेत्र असुन ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले असुन
त्यावर पिक लागवड करत आहे. परंतु सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७ /१२ मध्ये पोट खराब म्हणुन दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून सदरचे पोटखराब क्षेत्र गाव नमुना नंबर ७/१२ वर वहीतीखाली लावणेकामी तक्रारदार यांची पत्नी यांचे नावे दि.४ सप्टेंबर २०२५ रोजी पाचोरा उप विभागीय कार्यालयात अर्ज करुन अर्जात नमुद केलेले काम करुन देण्यासाठी सदर कार्यालयातील गणेश लोखंडे यांची भेट घेत.तेव्हा त्यांनी सदरचे
काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एकुण १५,००० /- रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांची इच्छा नसतांना त्यांनी लोखंडे यांना ५ हजार रुपये रोख दिले होते व बाकी १० हजार रुपये दिल्यावर तुमचे काम करुन देईल,असे लोखंडे यांनी सांगीतले होते.परंतु तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे बाकी असलेले १० हजार रुपये लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी ला.प्र.वि, जळगाव यांचेकडे तक्रार दिली त्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी केली असता गणेश लोखंडे यांनी यापुर्वी ५ हजार रू. स्विकारल्याचे कबुल करून बाकी असलेले १० हजार लाचेची मागणी केली.
(ads)
त्याप्रमाणे आज दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान आलोसे गणेश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून मागणी केलेल्या १५ हजार रू.लाचेच्या रकमे पैकी दुसरा हप्ता १० हजार रुपये लाचेची रक्कम गणेश लोखंडे यांनी स्वत: करीता तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे.
(ads)
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, आपण पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी हेमंत नागरे, पोलीस शिपाई भूषण पाटील राकेश दुसाने अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली.



