यावल ( सुरेश पाटील ) : जळगाव,भुसावळ,चोपडा,यावल रावेर तालुक्यात अनेक अवैध वाळू वाहतूकदार आहेत यापैकी ५० % वाळू वाहतूकदारांकडून शासनाच्या वेगवेगळे तीन विभाग कारवाई करण्यासाठी रात्रीच्या वेळेस पथक नियुक्त असतात. तिघांपैकी एक विभाग आक्रमक होऊन अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी पुढे येत असतात काल मंगळवार दि.९ सप्टेंबरच्या २०२५ रात्री एलसीबी पथकाने बऱ्हाणपुर - अंकलेश्वर या राष्ट्रीय मार्गावर अवैध वाळू वाहतूकदारांवर नजर ठेवून सिनेमा स्टाईल कारवाईचा देखावा केला परंतु ती कारवाई गुलदस्त्यात असून याबाबत कुठेही नोंद झाली नसल्याची चर्चा संपूर्ण वाळू वाहतूकदारांमध्ये सुरू आहे.
(ads)
अवैध वाळू वाहतूकदार आणि बांधकाम करणारे घर,दुकान, अपार्टमेंट,मालकांची बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कॉन्टॅक्टर यांची वाळूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक पीळवणूक असल्याने शासनाच्या या सोयीनुसार मनमानी कारवाई बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिनेमा स्टाईल कारवाई केली परंतु एकाही कारवाईची नोंद कुठे झालेली नाही असे का.,? अवैध वाळू वाहतूक कशाप्रकारे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे सहकार्यामुळे सुरू आहे आणि यातून दर महिन्याला कोट्यावधी रुपयाची मासिक उलाढाल तर होत नाहीना असे प्रश्न निर्माण होत आहे. यंत्रणेत आपापसात मतभेद निर्माण झाले असून यात कलेक्शन करणारे किती कलेक्शन करतात..? आणि कोणाकोणाला वाटप करतात..? याबाबतची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकारी कलेक्शन करणाऱ्या कडून घेऊन शंका निर्माण करीत असल्याने त्याचे विपरीत परिणाम अवैध वाळू वाहतूकदारांना होत असून त्याचा मानसिक व आर्थिक त्रास अवैध वाळू वाहतूकदारांना होत आहे. असा सूर जन माणसांमधून निघत आहे.
(ads)
महसूल,स्थानिक पोलीस,विभागीय पोलीस,एलसीबी यांचे रात्रीचे फिरस्ती पथक वेगवेगळे असताना यांना रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने वाहतूक करताना दिसत नाहीत का.? यात फक्त वाळू वाहतूकदार नाहीत ही तर सुद्धा अवैध धंद्यांची जोरदार वाहतूक आहे त्यांच्याकडून दरमहा मासिक हप्ते गोळा करणारा कलेक्शन, कलेक्टर कोण.? आणि संपूर्ण कलेक्शनचा हिशोब तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देतो का..? आणि कलेक्शन होत नसेल तर अवैध वाळू वाहतूकदारांवर, आणि इतर अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.अवैध वाळू वाहतुकीचे कलेक्शन कोणाकोणाला दिले जाते याची नावानिशी माहिती एकमेकाला दिली जात असल्याने आपापसात मतभेद निर्माण झाल्याने अवैध वाळू वाहतूकदार यांच्याकडून वाढत्या प्रमाणात हप्त्याची मागणी होत असल्याने,काही कलेक्शन करणारे महारथी तर अवैध धंद्यांमध्ये भागीदारीचा घाट रचण्याच्या तयारीत असल्याची चर्चा यावल रावेर चोपडा तालुक्यात आहे आणि याचा विपरीत परिणाम अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांसह बांधकाम करणारे घरमालक,व्यवसायिक,कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर होत असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.जळगाव, भुसावल,यावल, रावेर, चोपडा परिसरात असलेल्या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असताना त्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अवैध वाहतूक वाहनांची नोंद होत नाही का ? रात्रीच्या वेळेस सुरू असलेली वर्दळ तिन्ही शासकीय यंत्रणेला दिसत नाही का.? आणि याची नोंद होत असल्यास पोलीस महसूल आणि एलसीबी पथक कारवाई का.? करत नाही.?
(ads)
यातच सर्व अलबेल बराबर असल्याचे जनतेला दिसून येत असल्याने अवैध वाळू वाहतुकीतील हप्ते खोरी बंद करायला पाहिजे नाहीतर अवैध वाळू व इतर अवैध वाहतूक करणाऱ्यांची आर्थिक पिळवणूक कशी थांबेल ? याबाबत जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय साधून ठोस निर्णय घ्यायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.कारण गेल्या आठ दिवसात डंपर ट्रॅक्टर द्वारा वाहतूक करणाऱ्या अवैध वाळूचे रेट १ एक हजार रुपये दराने कोणत्या कारणाने आणि कोणामुळे झाली याबाबतची चर्चा संबंधित यंत्रणेत सुरू आहे.



