समूह साधन केंद्र शाळा विवरे बु.।। येथे विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 विवरे बु.।।येथील समूह साधन केंद्र शाळेत स्पोर्ट ड्रेस तसेच इतर शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. साहेबराव शिंदे होते. यावेळी विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस , स्काऊट गाईड ड्रेस , आय कार्ड , बेल्ट व इतर शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

(ads)

 यावेळी माजी सरपंच श्री. वासुदेव नरवाडे यांनी आपल्या भाषणातून पंधराव्या वित्त आयोगातून शाळेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासित केले. उपसरपंच श्री. विनोद मोरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षकांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.

(ads)

 कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र समन्वयक श्री. दीपक सोनार सर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. मजीत तडवी ,सरपंच श्री.युनूस तडवी, ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक राणे, श्री. युसुफ खाटीक, सौ. पूनम बोंडे ,सौ. नीलिमा सनसे , सौ. ज्योती सपकाळ, सौ. नौशाद बी इस्माईल शेख इ.मान्यवर उपस्थित होते.

(ads)

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश बागुल सर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दिनेश माळी, उपाध्यक्ष श्री.मेहरबान तडवी, श्री.दिनकर राणे सर,सॊ.निलिमा गावित मॅडम व श्री.सम्राट निकम सर सर्व शिक्षक वृंद तसेच ग्रामपंचायत येथील कर्मचारी श्री.सुरज नरवाडे,श्री.राहुल पारस्कर यांनी मेहनत घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!