ऐनपूर: ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्ताने रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेयरमन श्रीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव संजय पाटील आणि संचालक एन.व्ही. पाटील उपस्थित होते.
(ads)
रांगोळी स्पर्धेत विद्यार्थिनींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सामाजिक कार्य या विषयावर आकर्षक व रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या.
पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सरदार वल्लभभाई पटेल या महान व्यक्तिमत्वावर आधारित संदेशात्मक पोस्टर्स तयार केली. या पोस्टर्समध्ये चित्रकलेसोबतच माहितीपूर्ण संदेशांनाही महत्त्व दिले गेले.
(ads)
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ .पी.आर.महाजन यांनी केले.प्रथम क्रमांक -कृष्णाली किशोर पाटील. द्वितीय क्रमांक -रिंकू सोपान चौधरी. तृतीय क्रमांक -यामिनी प्रल्हाद चौधरी. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण डॉ. एस.ए.पाटील यांनी केले.प्रथम क्रमांक-रुचिका विजय महाजन, द्वितीय क्रमांक - वेदिका प्रदीप पाटील, तृतीय क्रमांक- वेदिका अनिल पाटील.
(ads)
दोन्ही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून परीक्षकांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समन्वयक प्रा ऋतुजा पाटील यांनी काम पाहिले . या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेलांच्या १५० वी जयंती वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजन समिती चे चेअरमन डॉ पी आर महाजन,सदस्य जे पी नेहते, उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर तसेच प्रा भारती पाटील, प्रा वैष्णवी पाटील, प्रा कोमल सुतार यांनी मेहनत घेतली. तसेच श्रेयस पाटील, हर्षल पाटील यांनी विशेष सहकार्य केले.