यावल ( सुरेश पाटील )
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मिनल करणवाल यांना ग्रामरोजगार सहाय्यकांच्या दि. एक ऑक्टोबर दोन हजार चोविस पासुन आठ हजार फिक्स आणि इंटरनेट व प्रवास खर्च,अल्पोपहार भत्तासाठी दोन हजार प्रमाणे दहा हजार प्रमाणे शासनाने निर्णय घेतलेला आहे तेव्हा पासुन गेल्याअकरा महिन्याचे थकित दरमहा मानधन वेळेवर मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले त्यांच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार रोहयो मंत्री भरत गोगावले आणि प्रधान सचिव गणेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
(ads)
निवेदनानुसार गेल्या अकरा महिन्यांपासुन प्रलंबित असलेले ग्रामरोजगार सहाय्यकांचे फिक्स मानधन तातडीने त्यांच्या वैयक्तिक खात्यावर देण्यात यावे, याविषयी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दि. तीन ऑक्टोबर दोन हजार चोविसच्या नियोजन अंर्तगत रोहयो विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांना शासन निर्णयानुसार अद्यापपर्यंत ठोस मानधन देण्यात आलेले नाही त्यामुळे राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कामांबाबत खुप व्याप वाढवलेला आहे त्यांच्याकडे दिवसभर जॉबकार्ड धारक मजुरांची उपस्थिती करून नोंदविणे तसेच सोशल ऑडिटपर्यंत मनरेगाची सर्व कामांची जबाबदारी त्यांच्यावर शासनाने लादलेली आहे एवढी सर्व कामे करून सुद्धा गेल्या अकरा महिन्यांपासुन मानधन मिळालेले नाही यामुळे ग्रामरोजगार सहाय्यकांच्या कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आहे.
(ads)
शासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष घालून लवकर न्याय द्यावा अन्यथा संघटनेकडून प्रत्येक जिल्ह्यातुन राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा संघटनेच्या शामाप्रसाद मुखर्जीl उद्यानात झालेल्या मिटिंगमध्ये नागपुर येथे एक दिवसीय आंदोलन करणे बाबत ठराव करण्यात आलेला आहे. यावेळी राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे राज्य संघटक उमेश तायडे, खुशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक झाली आंदोलन विषयी ठरावाचे सूचक बाळासाहेब तायडे अनुमोदक शांताराम जाधव आहेत संघटनेच्या मिटिंगला जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बहुसंख्येने उपस्थित होते.