रावेर महसूल सेवक(कोतवाल) मीटिंग, रावेर तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेचे आभार
निंभोरा प्रतिनिधी:-
आज दिनांक 27/09/2025 रोजी रावेर तालुका महसूल सेवक(कोतवाल) संघटनेची चतुर्थ श्रेणीसाठी सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाबाबत मीटिंग आयोजित करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष सचिन ज्ञानेश्वर कोळी यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. *मीटिंग आयोजनाचे विशेष म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत रावेर तालुका महसूल सेवक यांचा संविधान चौक नागपूर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषण व आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राहील असे जाहीर करण्यात आले.
(ads)
रावेर तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी महसूल सेवक यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे निवेदन दिल्याबद्दल रावेर तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तालुकाध्यक्ष सचिन कोळी, महसूल सेवक विकास माळी,विनोद अटकाळे, प्रविण धनके, अरुण मनुरे, नितीन तायडे, नयना अवसरमल, माधुरी महाजन, निशा तडवी, सचिन राठोड, जाकीर तडवी, व सर्व महसूल सेवक यांची उपस्थिती होती.