रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात शहीद-ए-आझम भगतसिंग जयंती राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यालयीन अधीक्षक श्री वाय. आर. बिरपण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
(ads)
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भूगोल विभाग प्रमुख प्रा. सी. पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांना भगतसिंग यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, भगतसिंग हे भारताचे क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक होते. लाहोर कट (सोंडर्स वध), ब्रिटिश असेंबलीतील बॉम्ब स्पोट प्रकरणातील साहसी कारवाई, ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेली हाक आणि तरुणाईत निर्माण केलेली देशभक्ती यामुळे त्यांना 'शहीद-ए-आझम' ही उपाधी मिळाली. फाशीच्या तख्तावर जाताना त्यांनी हसत-हसत "इन्कलाब जिंदाबाद"चा जयघोष केला होता. भगतसिंग यांच्या विचारांमुळे देशातील तरुणाईत स्वातंत्र्य लढ्याची आणि देशभक्तीची प्रेरणा निर्माण झाली.
(ads)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन यांनी केले. त्यांनी भगत सिंह यांचे क्रांतिकारी विचार विद्यार्थ्यांना सांगितले ,आभार प्रदर्शन उपअधिकारी प्रा.एल. एम. वळवी यांनी केले.
(ads)
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री वाय. आर. बिरपण, आय. एम. बारी, सतीश वाघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली व शहीद भगतसिंग यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित झाले.



