https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

मातंग समाज समन्वय समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदावर किशनदादा गायकवाड यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


उमरी : उमरी तालुक्यातील आघाडीचे कार्यकर्ते किशन दादा सटवाजी गायकवाड हे साहाव्या वर्गात शिक्षण घेत असताना १९८४ साली स्वतः च्या मौजे कुदळा ता उमरी जि नांदेड या गावातील शिमग्याच्या होळीत मांग बाजाची होळी करून बालपणापासून सामाजिक चळवळीत सहभागी होऊन समाजाला जागृत करून त्यांना गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी विध्यार्थी दशेत नांदेड जिल्ह्यात त्या काळी चळवळ उभी करून जीवाची पर्वा न करता प्रस्थापित सत्ताधारी लोकप्रतिनिधीं व त्यांच्या इशा-यांवर नाचणा-या लाचार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात सत्तत संघर्षे करून समाजाला संघटित करून विषमते विरोधात आज पर्यंत लढा देणारे समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर यांच्या कार्याची दखल घेऊन मातंग समाज समन्वयक समीतीचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांनी मातंग समाज समन्वय समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदावर नियुक्ती केल्याबद्दल दि २७/०९/२५ रोजी रात्री ९ वाजता वाँटसाफद्धारे मुंबई प्रदेश कार्यालयातुन नियुक्ती पत्र पाठवले असून सदर नियुक्ती पत्रात नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख पदांचीही जबाबदारी देण्यात आली असून. पुढील भावी कार्यासाठी किशनदादा गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

(ads)

         सदरील नियुक्ती पत्रात असे लिहिले आहे की, मातंग समाज समन्वयक समीती, महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना, शिव शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणारी संघटना आहे. मातंग समाज समन्वयक समीती महाराष्ट्र राज्याच्या वतिने राज्य कार्यकारिणी युवक आघाडी, महीला आघाडी, कर्मचारी युनियन, विध्यार्थी आघाडी इत्यादी समन्वयक समीतीच्या सर्व सहमतीने किशनदादा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व आघाडीच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तर नियुक्ती पत्रात पुढे असे म्हटले आहे की, भविष्यात आपल्या हातुन मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात विकास व्हावा या उद्देशाने आपली नियुक्ती करण्यात आली आहे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

  (ads)

      महाराष्ट्र राज्याच्या मातंग समाज समन्वयक समीती महाराष्ट्र प्रदेश च्या सल्लागार पदावर नियुक्ती केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांचे किशनदादा गायकवाड यांनी आभार मानले असून मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी यामुळे महाराष्ट् पातळीवर मला अजून उर्जा मिळाली आहे. याचे नक्कीच मी सोने करेल अशी भावना व्यक्त केलेली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!