सांसारिक प्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव तरुण तरुणींनी ठेवावी : राजेश झाल्टे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 जळगाव :- उद्यमशील, समाजशील व्यक्तिमत्त्वाच्या तरुण-तरुणींनी आपल्या संसारिकप्रपंचा सोबतच सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून आपल्या योग्य जोडीदाराची निवड करताना आपलं कुटुंब , समाजहित, देशहित जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहून तथागत गौतम बुद्धांचा विचार आपल्या संसरीक जीवनात अनुसरावा असे मत ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे यांनी बौद्ध वधू वर परिचय मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. 

                    मुकुंद सपकाळे 

          मुख्य अतिथी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी आपल्या सांसारिक जीवनामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तरुण-तरुणींनी स्वतःला शैक्षणिक प्रगत करून विचारांची परिपक्वता, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे मनोधैर्य भक्कम करावे असे मत मांडले. 

   (ads)

                    संजय इंगळे 

          उद्घाटन उद्योजक संजय इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी जी मुलगी या परिचय मेळाव्यातून विवाहबद्ध होईल मात्र तिचे आई , वडील हयात नसतील त्या मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाईल असे सांगितले तसेच प्रत्येकाने उचित वयातच विवाह करावा असे आवाहन केले .

                          जयसिंग वाघ 

           प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की अलीकड परिचय मेळावे मोठ्याप्रमाणात होत आहेत मात्र अश्या मेळाव्यातून विवाह जुळवून येत नसल्याचे दिसत आहे ही परिस्थिती चिंताजनक आहे . बरेच तरुण , तरुणी विवाहानंतर कुटुंबापासून वेगळे होतात त्यामुळे आई , वडिलांचे स्वप्न भंग होते , आपण आपली प्रगती आई , वडिलांच्या कष्टानेच केलेली असते याचे भान आपण विसरता कामा नये .

  (ads)

                   डॉ. मिलिंद बागुल 

प्रसिद्ध साहित्यिक तथा विद्रोही कवी डॉ. मिलिंद बागुल यांनी आपल्या भाषणात प्रत्येक मुला , मुलीने आपले आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्तन करावे , आई , वडिलांना अंधारात ठेऊन कोणतेही कृत्य करू नये . मानवी जीवनात विवाह होणारच मात्र त्या करिता आपण आपला समाज वा नातलग विसरता कामा नये .

                      भारती रंधे 

             प्रसिद्ध महिला समुपदेशक भारती रंधे यांनी आजच्या परिस्थितीत विवाह जुळणे मोठे अवघड झालेले असले तरी समजदार भूमिका आपण घेतली तर हे जटिल प्रश्न सुध्दा पटकन सुटू शकतात असे सांगितले .

  (ads)

     ॲड. पंकज मेढे, दिलीप सपकाळे, रवींद्र इंगळे, मनीषा सुरवाडे, उमेश शिरसाठ यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले .परिचय मेळाव्याची सुरुवात सुभाष सपकाळे व मुकेश जाधव यांनी बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशीलाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी केले , मुख्य संयोजिका चंदा सुरवाडे यांनी मागील मेळाव्यामधीलसूत्र अनुभव कथन केले .सूत्रसंचलन बापूराव पानपाटील यांनी तर आभार श्रावण निकम यांनी मानले मान्यवरांचे स्वागत दीपक बनसोडे,सुभाष सपकाळे ,मुकेश जाधव प्रशांत सोनवणे,मनीष साबळे,मिलिंद साबळे ,मुन्ना भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यास राज्यभरातून तसेच गोवा , गुजरात , मध्यप्रदेश येथून वधू , वर मोठ्यासंखेने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!