यावल ( सुरेश पाटील ) शहरात स्मार्ट विजमीटर बसविल्यामुळे ग्राहकांना आवाजही वीज बिल येत असल्याने म.रा.वीज वि.कंपनीचे यावल येथील उपकार्यकारी अभियंता यांनी तात्काळ समाधानकारक तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जळगाव जिल्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला.
(ads)
म.रा.वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे आज २९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरात दोन-तीन महिन्यापासून नवीन स्मार्ट मीटर आपल्या म. रा.वी.वि.कंपनी मार्फत बसविले जात आहे तरी हे नवीन स्मार्ट मीटर जास्त फिरत असून त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज बिले ही जास्त रकमेची येत आहेत अशा अनेक तक्रारी शहरातील नागरिकांच्या असल्याने नागरिकांना विज बिल जास्त प्रमाणात येत आहे.
(ads)
त्याबाबत समाधानकारक तोडगा न काढल्यास वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल वसंतराव पाटील यांच्यासह एल.बारसे,सचिन बारी,विठ्ठल जाधव,निलेश धांडे,अनिल बारसे,संजय घारु, अरुण घारू,राजू पाटील,राहुल चव्हाण,नरेंद्र शिंदे,अरुण डी. पाटील, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे, निवेदनाच्या प्रती म.वी.वि.कंपनीचे जळगाव येथील अधीक्षक अभियंता,सावदा तालुका रावेर येथील कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे



