ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ.डी. बी. पाटील (माजी मुख्य कार्यक्रम अधिकारी) व दुसरे वक्ते प्रा.डॉ. जे.पी. नेहेते (विभागीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्राची सेवा योजनेत का सहभागी व्हावे या विषयावर मार्गदर्शन केले.
(ads)
तसेच ज्या ठिकाणी आपले वास्तव्य आहे त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा असे सांगितले. तर डॉ. डी. बी. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास आणि स्थापना याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ. जे.पी. नेहेते यांनी राष्ट्रीय सेवा योजना मार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राविषयी जागृती असली पाहिजे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके (मुख्य कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(ads)
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रा. एस. पी. उमरीवाड सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पी. पाटील महिला कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव डॉ. जे.पी. नेहेते, डॉ. डी बी पाटील, प्रा.एच. एम. बाविस्कर, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. अंकुर पाटील, प्रा, डॉ. एस, एस. साळुंके तसेच श्रेयस पाटील, हर्षल पाटील व प्रणव पाटील यांनी सहकार्य केले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.