यावल येथील होमगार्ड दलातर्फे वृक्षारोपण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार यावल येथे पोलीस वसाहत मैदानावर इतर ठिकाणी यावल येथील होमगार्ड बांधवांनी वृक्षारोपण केले.

(ads)

जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार तसेच होमगार्डचे प्रशासकीय अधिकारी आर.एम.काळे केंद्र नायक गंगाधर महाजन वरिष्ठ निदेशक मदन रावते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांच्या नेतृत्वात यावल होमगार्ड तर्फे हरित महाराष्ट्र व समृद्ध महाराष्ट्र या अभियान अंतर्गत गृह विभागाच्या ०५ लक्ष वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांसाठी यावल पोलीस कवायत मैदान व जिल्ह्यात ठिकठिकाणी शहरातील व तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

(ads)

असून या प्रसंगी तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे,वरिष्ठ फलटण नायक पंकज फिरके, कंपनी सर्जन मेजर सार्जंट संगीता पाटील,अर्चना कोळी, निशा कदम कैलास लावणे,विशाल बारी, अनिकेत बिराडे,महेंद्र माळी,नितीन कोळी,किरण तळेले,विश्वनाथ बारी, संतोष बारी,लक्ष्मण लाड,अंजली सोनवणे,आरती बारी,संगीता मिस्तरी,सुनंदा वाघ यांच्यासह पुरूष महिला असे होमगार्ड उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!