यावल ( सुरेश पाटील ) यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील युवराज उर्फ युवा राजु भास्कर वय ३४ याच्याजवळ अवैध देशी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र ) व दोन जिवंत राऊंड हे त्याचे ओळखीचा भूषण कैलास सपकाळे वय ३१ रा.वराडसिम तालुका भुसावल येथील अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने दोघेजण आढळून आल्याने यावल पोलिसांनी या दोघांना अटक करून आज यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२८ पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.
(ads)
अटक झालेल्या दोघांपैकी एका आरोपीने तालुक्यातील एका पत्रकाराला मारण्याची सुपारी आपली नैतिकता दाखवून नाकारली होती.
दिलेली फिर्याद बघितली असता देशी बनावटीचा गावठी पिस्तोल व २ जिवंत काडतुस,२ मोबाईल हँडसेट असा एकूण अंदाजे ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल युवराज उर्फ युवा राजीव भास्कर, व भूषण सपकाळे याचे अंग झडतीत मिळून आले.असता सदर पिस्टल व जिवंत काडतुस ताब्यात घेवून युवराज भास्कर यास पंचासमक्ष सदर पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर पिस्टल ही भुषण कैलास सपकाळे यास विक्री करण्यासाठी ठरल्याप्रमाणे आणलेली होती असे सांगीतले
(ads)
तसेच भुषण कैलास सपकाळे यास पंचासमक्ष विचारपुस केली असता तो सदर पिस्टल ही युवराज भास्कर याचेकडून विकत घेण्यासाठी आलेला होता,सदर पिस्टल व काडतुसचेचे बदल्यात तो युवराज भास्कर यास २६ हजार रुपये नंतर आणुन देणार होता असे पंचासमक्ष सांगीतले.सदर पिस्टलबाबत युवराज ऊर्फ युवा राजु भास्कर याचेकडे अधिकृत परवाना आहे अगर कसे याबाबत पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे पंचासमक्ष सांगीतले.पोउनि सोपान गोरे यांनी पंचासमक्ष युवराज भास्कर यास विचारणा केली की तुझ्याकडे ३ देशी बनावटीचे पिस्टल व ६ जिवंत काडतुस असल्याची गोपनीय माहीती आमच्याकडे आहे,सदर पिस्टल व काडतुस कोठे आहे असे विचारले असता त्याने पंचासमक्ष सांगीतले की दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी मी यावल शहरातील यावल भुसावळ रोडवरील भुसावळ नाका जवळील बियर शॉपजवळ माझे ओळखीचा समाधान बळीराम निकम रा.पाचोरा याचेकडून ३ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुस विकत घेतले होते.
(ads)
त्यापैकी मी २ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुस शुक्रवारी दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी अमळनेर येथील माझे ओळखीचा अनिल मोहन चंडाले यास अंमळनेर येथे जावून रुपये ४० हजार रुपयाला विक्री केले आहे अशी हकीकत सागीतली सदर कार्यवाहीचा सविस्तर पंचनामा सहाय्यक फौजदार विजय धनराज पाचपोळे यांनी केला.
(ads)
काल बुधवार दि.२४ रोजी २३:५० वाजेच्या सुमारास यावल शहराजवळ यावल ते चोपड़ा जाणारे हायवेवर दहीगाव फाटा येथे युवराज ऊर्फ युवा राजु भास्कर वय ३४ वर्षे रा.बोरावल गेट यावल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ यावल त्याचे जवळ अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल ( अग्निशस्त्र ) व २ जिवंत राउंड हे त्याचे ओळखीचा भुषण कैलास सपकाळे वय ३१ वर्षे रा. वराडसिम,डॉ.आंबेडकरनगर ता. भुसावळ यास अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आलेला आहे. या कारणावरून दोघं आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम. 3 ( 1 ), 25 ( १-ब), ५ (१), २५ ( १ ) ( अ ).२९ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२८ पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याच्या आदेश देण्यात आले.
(ads)
एका अवैध धंदे चालकाने या आरोपीला तालुक्यातील एका पत्रकाराला मारण्याची सुपारी दिली होती..?
यावल तालुक्यातील एका पत्रकाराने एका अवैध धंदे चालकाचे दोन तीन प्रकरण रीतसर कायदेशीरपणे प्रसिद्ध केले होते आणि आहे त्यामुळे त्याचे वाईट वाटून त्या एका अवैध धंदे चालकाने यातील एका आरोपीला फक्त पाच हजार रुपयाची सुपारी देऊन पत्रकाराला मारण्याची सुपारी दिली होती परंतु सदरच्या आरोपीने आपली नैतिकता दाखवून पत्रकाराला मारण्याची सुपारी नाकारली होती. त्याचा तपास चौकशी केल्यास अवैध धंदे करणारा यांच्यासोबत आरोपी होऊ शकतो अशी चर्चा आहे.