पशुवैद्यकीय अधिकारी भगुरे यांचा त्यांच्या निवासस्थानी अकस्मात मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील पाडळसे येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक रतनलाल छोटूराम भगुरे वय ४८ यांचा यावल येथील पांडुरंग सराफनगर मधील त्यांच्या निवासस्थानी अकस्मात मृत्यू झाल्याने यावल शहरात मोठी खळबळ उडाली.

(ads)

पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल भगुरे हे तालुक्यातील पाडळसे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते ते यावल शहरात पांडुरंग सराफनगर मधील आत्माराम रामसिंग पाटील रिटायर शिक्षक यांच्या घरात ते एकटे राहात होते.आज गुरुवार दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी ते मयत स्थितीत आढळून आल्याची खबर आत्माराम पाटील यांनी यावल पो. स्टे.दिली.

(ads)

पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल भगूरे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण चौकशी अंति समोर येणार आहे.एका अधिकाऱ्याचा संशयास्पद अकस्मात मृत्यू झाल्याने संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली तसेच त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला.? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आत्माराम पाटील यांनी यावल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!