यावल ( सुरेश पाटील ) रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण तर्फे ७ शिक्षकांची नेशन बिल्डर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.क्लबचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी व सचिव रोहित शिंदे यांनी ही माहिती दिली.
यावल येथील निवृत्त मुख्याध्यापक एस.आर.फेगडे ( डॉ.कुंदन फेगडे ) यांचे वडील ) यांना रोटरी क्लबतर्फे जीवन गौरव विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.बागलाण तालुक्यातील आशा अहिरे ( प्रगती विद्या मंदिर सटाणा ), हर्षदा चव्हाण ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गढीपाडा ), विकास सोनवणे ( जनता विद्यालय,अंतापबर ), किरण पाटील ( लोकनेते पं.घ. पाटील मराठा हायस्कूल, सटाणा ), गणेश वाघ ( क्रीडा शिक्षक, बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल, सटाणा ),दीपक जाधव ( कलाशिक्षक,आदर्श इंग्लिश मीडियम स्कुल सटाणा ) या ६ शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवार्ड आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असलेले निवृत्त मुख्याध्यापक फेगडे यांनी ३० वर्षांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले असून शंभरहून अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.