यावल (सुरेश पाटील) : यावल येथील भूषण पंढरीनाथ नगरे यांची जळगाव जिल्हा "पोलीस बॉईज असोसिएशन" अध्यक्षपदी नियुक्ती पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी केली.
(ads)
भूषण नगरे हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असून ते पोलीस परिवारातील सदस्य आहेत.त्यांचे पोलीस बांधवांशी सलोख्याचे स्नेहपूर्ण संबंध असून सतत संपर्कात असतात सन २०२० पासून ते पोलीस बॉईज असोसिएशन मधे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम करत आहेत.
(ads)
जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,होमगार्ड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ते पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी भूषण नगरे यांच्यावर " जळगाव जिल्हाध्यक्ष ” पदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस दलातून आणि त्यांच्या हितचिंतक मित्रमंडळीसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.