मोठा वाघोदा येथील निंभोरा रस्त्यावर मिनी स्विमिंग पुल
सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार उघड
रावेर तालुका प्रतिनिधी (प्रशांत गाढे)
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे ते निंभोरा येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठे वाघोदे ते निंभोरा या महत्त्वाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांनी आता अपघातांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.पावसाळा पावसाळा झाली तरी या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी किंवा पावसात हे खड्डे न दिसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत.
(ads)
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने खड्ड्या मधील पाणी टू व्हीलर चालकांच्या अंगावर उडत असतात नागरिकांना मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याने नागरिकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे की रस्त्यामध्ये मिनी स्विमिंग पूल तयार झाला की काय.?
सदरील रस्ता हा प्रमुख रस्ता असून सावदा तसेच फैजपूर येथे शिक्षणासाठी विद्यार्थी दळणवळणासाठी वापर करत असतात. सावदा व फैजपूर येथे हॉस्पिटल व इतर कामांसाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करीत असतात.
(ads)
संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असून एखादी जीवित हानी होण्याची वाट बघत आहे की काय.?असे प्रश्न निर्माण होत असून सदरील सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी सदर विषयात लक्ष्य घालून लवकरात लवकर रस्तावर खड्डे बुजून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.



