फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची दिशाभूल करीत कार्यक्षेत्रात अवैध धंदे सर्रासपणे सुरू : पत्रकारांनी केलेल्या तक्रारीचे काय..? तालुका सह जिल्ह्यात चर्चा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल / रावेर

 फैजपूर भाग पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत अवैध,बेकायदा धंदे चालकांविरुद्ध कारवाई करीत नसल्याने फैजपूर येथील पत्रकारांनी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली आहे त्या तक्रारी नुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ..? आणि अवैध धंदे बंद का नाहीत.? याबाबत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

(ads)

फैजपूर येथील पोलीस विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापासून १ किलोमीटर ते ४० किलोमीटरचे अंतरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू आहे.परंतु संबंधित पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि इतर काही जबाबदार पोलीस अधिकारी,कर्मचारी हे आपल्या विभागीय पोलीस अधिकाऱ्याची तथा डीवायएसपी यांची दिशाभूल करून अवैध धंदे बंद असल्याचे कागदपत्रे दाखवून दर महिन्याला कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील ठराविक कलेक्शन करणारे कलेक्टरचे माध्यमातून दरमहिन्याला २५ ते ३० पेट्यांची आर्थिक उलाढाल करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या उलाढालित कलेक्शन करणाऱ्या कलेक्टरांचे वसुलीचे २ स्वतंत्र विभाग करून ( म्हणजे अवैध चार चाकी वाहनधारकांकडील आणि अवैध बेकायदा सट्टा,पत्ता,अवैध बनावट देशी दारू,पन्नी दारू यांच्याकडून वसुलीचे कलेक्शन करणाऱ्यांचे दोन विभाग ) कलेक्शन सुरू आहे. हे कलेक्शन नेमके कोणाकोणाला वाटप केले जाते याची खात्री सुद्धा गेल्या दोन महिन्यापूर्वी एका जबाबदार अधिकाऱ्यांने केली असल्याचे बोलले जात आहे. तसेच खात्री करताना अवैध धंद्यांची प्रसिद्धी माध्यमातून यायला नको याची काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा कलेक्शन करणाऱ्याला दिला आहे. असे सुद्धा बोलले जात आहे.

(ads)

पोलीस विभागीय यांच्या कार्यक्षेत्रात कलेक्शन करणाऱ्यांचा पोशाख सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचा असतो तसा आहे म्हणजे कलेक्शन करणारा हा शासकीय कर्मचारी नसल्याचे स्पष्ट होते,की दाखविले जाते हा प्रश्न उपस्थित होत आहे.यासोबत कार्यक्षेत्रातील काही मोजके पोलीस कर्मचारी कधीही आपल्या शासकीय निश्चित केलेल्या पोशाखात का राहत नाही.? गोपनीय विभागातील पोलिसांना तसे अधिकार असताना परंतु कार्यक्षेत्रातील गोपनीय विभागातील काही ठराविक हे आपले गोपनीय रिपोर्ट वस्तुस्थिती जन्य ( अवैध, बेकायदा,धंद्यांची असलेली वस्तुस्थिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतात का..? इत्यादी अनेक प्रश्न फैजपूर पोलीस उपविभागीय कार्यक्षेत्रातील पत्रकारांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे उपस्थित झाल्याची चर्चा यावल तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!