ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान योजने अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्याने एक दिवसीय जेष्ठ नागरिकांसाठी व्यायाम विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे अध्यक्ष पद श्री भागवत विश्वनाथ पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यांनी भूषवले.
(ads)
प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रा डॉ पद्माकर पाटील, अधीसभा सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या शुभहस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. व्यासपीठावर डी के महाजन वाघोदा, टी महाजन ,टी एल पाटील खिर्डी,धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर चे प्रा राकेश तळेले, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश पाटील,ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री. श्रीराम नारायण पाटील, उपाध्यक्ष श्री रामदास नारायण महाजन, जेष्ठ नागरिक दत्तात्रेय महाजन , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने उपस्थित होते. प्रा. डॉ. पी. डी. पाटील अधिसभा सदस्य यांनी उद्घाटनपर भाषणात कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
(ads)
पहिल्या सत्रात निलेश पाटील यांनी जेष्ठ नागरिक आणि तरुण पिढी यांनी एकमेकांशी कसा समन्वय साधायचा या बाबतीत मार्गदर्शन केले.कुटुंबातील इतर सदस्यांनी व जेष्ठ नागरिकांनी सुदृढ संबंध निर्माण करुन आनंदी जीवन जगण्यासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. दुसऱ्या सत्रात डॉ रितेश चंदलवार निसर्गोपचार तज्ञ रावेर यांनी सांधेदुखी,तणाव, चिंता, अनिद्रा, इत्यादी आजारांवर उपचार म्हणून विविध व्यायामचे प्रात्यक्षिके करून घेतले.तिसऱ्या सत्रात अमरीश चौधरी जामनेर यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आवश्यक योगासने करुन दाखविले तसेच जेष्ठ नागरिकांकडून योगासने करुन घेतली. चौथ्या सत्रात डॉ पवन पाटील फिजिओथेरपीस्ट रावेर यांनी छोटेछोटे व्यायाम करुन घेतले. खिर्डि येथील जेष्ठ नागरिक यांनी स्वयं प्रेरणेने योगासने व प्राणायाम करुन दाखविले .भागवत पाटील, श्रीराम पाटील,जगन्नाथ पाटील,पी टी महाजन, गंभीर चौधरी, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांवर तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. रामदास महाजन व पी आर चौधरी यांनी ही कार्यशाळा आमच्या साठी खूप उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली.
(ads)
मा. श्री. भागवत विश्वनाथ पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण शिकलेले व्यायाम रोज सातत्याने करण्याचे प्रयत्न करु असे आश्वासन दिले. एकूण १०५ जेष्ठ नागरिक या कार्यशाळेला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ जयंत नेहेते व डॉ. डी. बी. पाटील यांनी केले व कार्यक्रम समन्वयक प्रा डॉ प्रविण महाजन यांनी आभार मानले; कार्यशाळेस सर्व संचालक मंडळ, परिसरातील जेष्ठ नागरिक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली



